देवगड तुळजापूर गाडीत महिलेचे दागिने लंपास, तीन लाख 80 हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे याबाबत सौ. सुप्रिया अविनाश गुंजाटे वय 28 वर्षे,. धंदा- गृहीणी, रा. मुळ रा. समडोळी, जि. ता. सांगली सध्या रा. बी 07, शिवज्योती कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड देवगड यांनी आपल्या चोरीबाबत तक्रार दिली असून या तक्रारीत म्हटले आहे की दि. 09/01/2024 रोजी सकाळी 11.30 वा. चे दरम्याने कवठेगुंलद कुमेमळा, ता शिरोळ, जि. कोल्हापुर येथुन निघते वेळी मी सोबत घेतलेले माझे सर्व सोन्याचे दागिने व्यवस्थित ज्वेलरी बॉक्समध्ये ठेवुन सदरचे बॉक्स जांभळ्या रंगाच्या प्रवासाची बॅगेमध्ये ठेवुन माझ्या भाचाच्या मोटार सायकलने सांगली बस स्टॅण्ड येथे देवगड येथे येण्यासाठी निघालो. त्यानंतर मी व माझी सासु व मुलगा असे दुपारी 01.00 तुळजापुर ते देवगड या बसने देवगड येथे
येण्यासाठी निघालो. सदर बसमध्ये मी जांभळ्या रंगाच्या प्रवासाची बॅग ही मी उभी असलेल्या
ठिकाणापासुन दोन सीटच्या पुढे ठेवलेली होती. त्यानंतर सदर बसमध्ये जास्त गर्दी असुनही मी माझ्या बॅगकडे लक्ष ठेवुन होते. त्यानंतर सदर बस कोल्हापुर बस स्टॅण्ड येथे आल्यावर बसमधील गर्दी कमी झाल्याने मला सदर बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळाल्याने मी माझी जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅग माझ्या जवळ घेवुन बसले त्यावेळी ती बॅग बंद स्थितीत व्यवस्थित होती. सदर बस गगनबावडा बस स्टॅण्ड येथे 10 मिनिट करिता थांबली. त्यावेळी मी व माझी सासु असे फ्रेश होण्यासाठी बसमधुन खाली उतरलो त्यावेळी माझ्या सोबतची जांभळ्या रंगाच्या प्रवासी बॅग गाडीच्या सीट खाली ठेवुन गेलेलो होतो. त्यानंतर आम्ही फ्रेश होवुन परत गाडीत आल्यावर सदर बॅग सीटच्या खाली आहे त्या स्थितीत होती. त्यानंतर असा प्रवास करुन गाडी देवगड बस स्टॅण्ड येथे रात्रौ 08.15 वा. चे मानाने आलो. त्यानंतर तेथे असलेल्या प्रवासी रिक्षेत बसुन आम्ही राहत असलेल्या बी 07, शिवज्योती कॉम्प्लेक्स, कॉलेज रोड देवगड येथे आलो व प्रवासात थकल्याने मी माझ्या सोबत असलेली प्रवासी बॅग उघडुन पाहीलेली नाही. सदरची बॅग ही मी आज रोजी दुपारी 12.00 वा.चे दरम्याने मला पुजा करायची असल्याने मी बॅग उघडुन पाहीली असता मला त्यात मी ठेवलेले सोन्याचे दागिने दिसुन आले नाही. सदर बॅगमध्ये ठेवलेले दागिन्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1)1,00,000 /- रुपये गंठण 4 तोळेचे सोन्याचे जु.वा.कि.सु. 2) 60,000/- रुपये नेकलेस, कानातले उतोळेचे सोन्याचे जु.वा.कि.सु.
3) 50,000/- रुपये लक्ष्मीहार पावणे तीन तोळेचे सोन्याचे जु.वा.कि.सु.
4) 20,000 /- रुपये राणीहार तीन पदरी अडीच तोळेचा सोन्याचे जु.वा.कि.सु.
5) 25,000/- रुपये गळ्यातील चैन 2 तोळेची सोन्याचे जु.वा.कि.सु.
6) 25,000/- रुपये गळ्यातील चैन । तोळेची सोन्याचे जु.वा.कि.सु.
7) 4,000 /- रुपये 10 भारचा छल्ला चांदीचा जु.वा.कि.सु.
8) 14,000 /- रुपये कानातील फुल झुबा 7 ग्रॅम सोन्याचा जु.वा.कि.सु.
9) 10,000/- रुपये कानातील वेल 5 ग्रॅम सोन्याचा जु.वा. कि.सु. एकुण किंमत सुमारे 3,08,000/- तरी दि.09/01/2024 रोजी सकाळी 11.30 वा. ते आज दि.11/01/2024 रोजी दुपारी 12.00 वा.चे दरम्याने मी माझे घरी बॅगेत ठेवलेले दागिने पुजा करणेकरिता पाहीले असता मिळुन आले नाही. तरी ते प्रवासा दरम्याने चोरी झाले असावे असे तक्रारीत म्हटले आहे









