वार्ताहर l पाली : रत्नागिरी तालुक्यातील किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली आयोजित पाली प्रीमियर लीग व किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफी या भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पाली येथील हेलिपॅड मैदानावर संपन्न झाल्या.यामधे पाली प्रीमियर लीग मध्ये लाईफलाइन चॅलेंजर्स हा संघ विजयी झाला तर छत्रपती वॉरीअर्स संघ उपविजेता ठरला. तसेच किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अयोध्या बांबर हा संघ विजयी झाला तर तिरुपती सावर्डे हा संघ उपविजेता ठरला.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या रत्नसिंधु योजनेचे संचालक किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने पाली येथे किंगमेकर चॅम्पियन्स ट्रॉफी व पाली प्रीमियर लीगचे पाच रात्री आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी अनेक मान्यवर,क्रिकेट खेळाडू यांनी सहकार्य केले होते. या दोन्ही स्पर्धात आठ संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गाव पातळीवरील ते आंतरराज्य अश्या खेळाडू आपला सहभाग नोंदवून अप्रतिम क्रिकेट खेळ दाखवून दिला.
यामधे पाली प्रीमियर लीग मध्ये लाईफलाइन चॅलेंजर्स ह्या विजयी संघाला रुपये ६६,६६६/- व चषक तर छत्रपती वॉरीअर्स या उपविजेता संघाला रुपये ४४,४४४/- व चषक देऊन गौरविण्यात आले. किंगमेकर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अयोध्या बांबर या विजयी संघाला रुपये १,११,१११/- व चषक तर तिरुपती सावर्डे संघ उपविजेता ७७,७७७/- व चषक असे देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाली चॅम्पियन्स ट्रॉफी मधील मालिकावीर प्रशांत सावंत ,अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ठ फलंदाज अमित दरडी व गोलंदाज प्रशांत सावंत यांना देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेत्या अयोध्या बांबर संघाला रुपये १,११,१११ व चषक तसेच उपविजेत्या तिरुपती सावर्डे संघाला रुपये ७७,७७७ व चषक देऊन गौरविण्यात आले तर चॅम्पियन्स ट्रॉफीतील यावेळी पाली चॅम्पियन्स ट्रॉफी मधील मालिकावीर एजाज कुरेशी,अंतिम सामन्यातील सामनावीर आसिफ शेख, उत्कृष्ठ फलंदाज किरण पवार,गोलंदाज विजय पावले यांना देण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री उदय सामंत, तसेच बक्षीस वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या रत्नसिंधु योजनेचे संचालक किरण सामंत,
स्वामीमालिक संस्थेचे संस्थापक मिलिंद पावसकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सौरभ खाके, सदस्य समीर गराटे, ओशो सावंत, नितीन गराटे,अतुल सावंत,गणेश चव्हाण, संदीप गराटे, विवेक सावंत, अमेय वेल्हाळ, मनीष सावंत, अमोल सावंत, प्रथमेश जाधव, अजित गराटे,संघ मालक श्रीराम रसाळ, नेताजी पाटील, सिद्धेश दूरकर, पवन सावंत,दर्पण सावंत, विघ्नेश कोत्रे, पद्मजा कांबळे,अवधूत गोंधळी, व किरणोदय युवा प्रतिष्ठान चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.












