कोकण परिमंडळ : तिळगुळाच्या गोडव्यासह मकरसंक्राती सणात अबालवृद्ध पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. अबालवृद्धांनी सुरक्षित उत्सवासाठी पतंग उडविताना वीज वाहिन्या, वीज खांब, वीज वितरण रोहित्रे इ.पासून सुरक्षित अंतर राखावे,असे महावितरणचे आवाहन आहे.
पतंगासाठी नायलॉन दोरा, धातूमिश्रित मांजाचा वापर करू नये. विद्युत यंत्रणेत वीज वाहिन्यांवर, विशेषतः इमारतीच्या गच्चीजवळून गेलेल्या वीज वाहिनीवर, रोहित्रावर अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. ते जीवघेणे व धोकादायक ठरू शकतो. अनेकवेळा लहान मुले लोखंडी सळई, लाकडी काठीने, वीज खांबावर व रोहित्रावर चढून तो काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शॉर्टसर्किट, विजेचा शॉक लागण्याच्या घटना घडू शकतात. पतंग उडविताना पालकांनी लहान मुलांबरोबर थांबावे किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवावे. शक्यतो मोकळ्या मैदानात पतंगोत्सव साजरा करावा.
तातडीच्या मदतीसाठी नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या २४ तास सेवेतील १९१२, १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
——-
प्रति,
मा.संपादक/प्रतिनिधी
मुद्रित व दृकश्राव्य माध्यमे
सिंधुदुर्ग/रत्नागिरी
कृपया उपरोक्त वृत्तास आपल्या लोकप्रिय माध्यमातून प्रसिध्दी देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती.
जनसंपर्क अधिकारी
कोकण परिमंडळ










