कला वैभव रत्नागिरीचा सांगितिक नजराणा ‘आज अयोध्या सजली…’

 

रत्नागिरी – रत्नागिरीतील आकाशवाणीचे मान्यता प्राप्त संगीतकार अवधूत अनंत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या प्रभू रामचंद्र यांच्या गीतांचा सुरेल नजराणा आज अयोध्या सजली कला वैभव यूट्यूब चैनल वर ऐकायला मिळणार आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संगीतकार बाम यांनी स्वरबद्ध केलेली सहा गाणी 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवशी कला वैभव यूट्यूब चैनल वर अपलोड केली जाणार आहेत. गायक स्वप्निल गोरे, प्रसाद शेवडे आणि वैदही करंबेळकर यांच्या सुरेल स्वरांत ही गीत आहेत. या कार्यक्रमासाठी संगीत संयोजन वैभव फणसळकर लेखन उल्का जोशी, देवगड, निवेदन वाचन स्वर सोनाली सावंत आणि अनुया बाम, निवेदन ध्वनिमुद्राण हर्षद जोशी देवगड, संकलन कौस्तुभ सुतार राजापूर यांचं सहकार्य लाभलं आहे. अवधूत बाम कला वैभव रत्नागिरी यांच संगीत आणि निर्मिती असलेला आज अयोध्या सजली या अल्बम मधील ही गाणी रामभक्तांसाठी एक अनोखी सांगितिक मेजवानी ठरणार आहेत. तरी सर्व रसिका श्रोत्यांनी या गाण्यांचा आनंद घ्यावा असं आवाहन संगीतकार अवधूत अनंत बाम यांनी केले आहे.