लोरे गावात गांगेश्वर ते सोनारवाडी रस्त्यावर अतिक्रम नाही;ग्रामस्थांचे निवेदन

राजकारणासाठी लोरे गावाची बदनामी करू नका; दिला इशारा

उबाठा च्या राजकीय आरोपांना लोरे ग्रामस्थांचे उत्तर

कणकवली : लोरे येथील गांगेश्वर ते सोनारवाडी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याची तक्रार खोटी आहे.  आम्ही या रस्त्याचे लाभधारक आहोत.

गावठणवाडी,गुरववाडी,हरिजनवाडी आणि सोनारवाडी या रस्त्यावर वर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण नाही. किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होत नाही. आम्हा सर्व लाभधारकांच्या दोन चाकी ,चारचाकी ,सहा चाकी गाड्या स्कुटर,ट्रक, ट्रॅक्टर डंपर या रस्त्यावरुन सुरळीत चालू आहेत. त्यामुळे राजकारणासाठी गावाची बदनामी करू नका असे निवेदन लोरे नंबर १ च्या ग्रामस्थांनी दिले आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना लोरे ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. त्यात ते म्हणतात,श्री तुळशीदास रावराणे यांनी आपल्या दोन घरांच्या मधून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले. तसेच गावातील बहुसंख्य लोकांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी स्वखुशीने दिल्यामुळे हे काम पूर्णत्वास आले.विरोधकांकडून होणारी तक्रार हा फक्त राजकीय स्टंट आहे,नेहमी विकास कामांना विरोध करायचा आणि गावामध्ये संभ्रह निर्माण करायचा हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा चालला आहे. कुठल्याही कामाला त्यांनी स्वतःची जमीन दिली नाही पण लोकांच्या सहकार्यातून झालेल्या कामाचा ( लोकांच्या जमिनीतून केलेल्या रस्त्याचा )लाभ मात्र आनंदाने आणि बिन्धास्तपणे घेत आहेत.

ग्रामपंचायत मध्ये विकास कामाचा आलेला निधी कश्या प्रकारे आणला जातो, कश्या प्रकारे खर्च केला जातो, कुणाची परवानगी घेतली जाते, याचे ज्ञान नसल्यामुळे नेहमी विरोधक विरोध करत असतात. नेहमी ग्रामपंचायत मध्ये विविध तक्रारी देऊन ग्रामपंचायत आणि तेथील कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालवत असतात. सरकारी कामात हस्तक्षेप करत असतात.याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत सुद्धा तक्रारदार विरोधात ते करत असलेल्या बदनामी बाबत निषेधाचा ठराव सुद्धा घेतलेला आहे.”गावचा विकास हाच आमचा ध्यास” या ब्रिद वाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करावे . यापुढे गावाची होणारी नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा नरेश गुरव व ग्रमस्थांनी दिला आहे.