सिंधुदुर्ग जिल्हा 14 वर्षा खालील मुला मुलींचा हॉलीबॉल संघ निवडण्यासाठी वेंगुर्ले येथे 19 जानेवारी रोजी निवड चाचणी

वेंगुर्ले | प्रतिनिधी : 14 वर्षाखाली मुला मुलींचा सिंधुदुर्ग जिल्हा हॉलीबॉल संघ निवडण्यासाठी निवड चाचणी शुक्रवार 19 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 3.30 वाजता वेंगुर्ले कॅम्प मैदानावर आयोजित केली आहे.

जिल्ह्यातील 14 वर्षा खालील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग हॉलीबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी निलेश चमणकर यांनी केले आहे.

संबंधित खेळाडूंकडे 1 जानेवारी 2010 रोजी चे किव्हा त्या नंतरचा मराठी आणि इंग्रजी मधील जन्म दाखला असणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी सॅमसंग 9420153694 किंवा निलेश चमणकर 94233 01106 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.