कांबळेलावगण गावातील महालक्ष्मी महिला मंडळ आठघराणे बलेकरवाडी आणि दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतिबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
महिलांच्या हळदी कुंकू समारंभाच्या निमित्ताने ह्या आरोग्यदायी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून दरवर्षी हे महिला मंडळ हळदीकुंकू निमित्ताने असे उपक्रम राबवतात. आजपर्यंत ह्या महिला मंडळाने रक्त गट तपासणी,शरीराची आरोग्य तपासणी, जयगड रोडलगत वाडीकडे येणाऱ्या रस्त्याची साफसफाई,वाडीची ओळख म्हणून बोर्ड लावणे, तसेच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून अधिकृत एसटी थांबा ,मुलांचे गुणगौरव, सामुदायिक रक्षाबंधन असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
हया वर्षी महिला मंडळाने संयुक्त विद्यमाने नेत्र व मोतिबिंदू तपासणी शिबिर आयोजित केले असुन सदर शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दिवालीबेन मोहनलाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरीचे डॉ.किशोरजी सुर्यवंशी व त्यांची टिम येणार आहे.या शिबिरात मोफत नेत्र व मोतिबिंदू तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि शिबिरातील रुग्णांना कमी दरात चष्मे देण्यात येणार आहे.
सदर शिबिराचा जरुर लाभ घ्यावा असे महिला मंडळाकडून सांगण्यात येत आहे.तसेच हे शिबिर शुक्रवार दिनांक 19/जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत संपन्न होईल याची नोंद घ्यावी











