मालवण | प्रतिनिधी : कोकण कृषी विद्यापीठ रोहा संशोधक डॉ. जितेंद्र कदम यांनी मालवण नगरपरिषद कार्यालयास गुरुवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांचे स्वागत करुन मालवण नगरपरिषदेच्या वतीने सन्मान केला.
डॉ. जितेंद्र कदम यांनी हळदीचे संशोधन करुन पेटंट मिळविणे, श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन व मानांकन, अलिबाग येथील विशेष प्रसिध्द पांढ-या कांद्याचे भौगोलिक संकेत (Geographical Indication) GI मानांकन मान्यता मिळविणे इत्यादीबाबत संशोधन केले असून कोकण तसेच महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात महत्वाची कामगीरी केली आहे.
डॉ.जितेंद्र कदम यांनी या संदिच्छ भेटी दरम्यान मालवण नगरपरिषदेने मागील तीन वर्षात केलेल्या विविध विकास कामांची पहाणी तसेच स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे सादरीकरण पाहीले. नगरपरिषदेने राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन नगरपरिषदेस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










