कणकवली : काल कणकवली शहरातील ५ व्हिडिओ गेम पार्लरवर कणकवली पोलिसांनी कारवाई करून ४४ मशीन व ४० हजाराची रोख रक्कमेसह सुमारे २ लाख ८७ हजाराचा ३७० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
याप्रकरणी संशयित राजु शिवराम जमादार ( ३७, रा. कणकवली- ठाकूरवाडी ), नितीन नारायण आळवे ( २५, रा. देवगड ), राजेसाब बाबाजान संदिमणी ( २५, रा. बिडयेवाडी कणकवली ), शैलेश गोपाळ राणे ( ३६, रा. वरवडे- कोष्टीआळी ), शंकर विठ्ठल तायशेटे ( ४०, रा. हरकुळ ), विलास शंकरराव देसाई ( ५२, रा. मिरज -सांगली ), मुजीब मंहमद शेख (सावंतवाडी -उभाबाजार), अविनाश शिवाप्पा पाटील ( २९, रा. कणकवली- बिजलीनगर ), रवींद्र श्रीपाद चव्हाण ( ४३, रा. कणकवली- टेंबवाडी ), विष्णू गणपत परब ( ३७, रा. कणकवली- परबवाडी ), वैभव नागेश काळसेकर ( ३०, रा. कणकवली- बाजारपेठ ), गोपाळ महादेव काणेकर ( ३०, रा. आंब्रड ), किरण बाबुराव हनमशेठ ( ५१, रा. कर्नाटक- बेळगाव ) यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












