विजघर येथील नारायण गवस यांची गळफास घेऊन आत्महत्या

crime

दोडामार्ग | प्रतिनीधी : हेवाळे गावातील एकाने विजघर बांबर्डे येथे गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर मृत इसमाचे नाव नारायण गोविंद गवस (५१) आहे. याबाबत गोविंद फकीर गवस (६१) रा. हेवाळे यांनी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याची समजते. हेवाळे गावातील नारायण गवस यांचा पुतण्या घराच्या मागच्या बाजूस गेला असता तेथे असलेल्या पेरुच्या झाडावर नारायण गवस यांनी गळफास घेतल्याचे गुरूवारी सकाळी ११:४५ वा.च्या सुमारास आढळून आले. याबाबत तात्काळ माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. नारायण गवस जिवंत असतील, त्यांना रुग्णालयात दाखल करावे या उद्देशाने ग्रामस्थांनी त्यांना खाली उतरवले व १०८ नंबर वर फोन करून रुग्णवाहिकेतून साटेली-भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून नारायण गवस हे मृत असल्याचे सांगितलं. तसेच या घटनेची माहिती दोडामार्ग पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अधिक तपास पोलिस करत आहे