लांजा येथील श्री जाकादेवी मंदिर पटांगणावर आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन संपन्न 

श्री संत सेना नाभिक समाज लांजाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन

लांजा (प्रतिनिधी) श्री संत सेना नाभिक समाज लांजाच्या वतीने आयोजित भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन गुरूवारी रात्री लांजाचे माजी नगराध्यक्ष सुनिल कुरूप व गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

लांजा येथील श्री जाकादेवी मंदिर पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या या तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल कुरूप व गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे यांच्यासह श्री संत सेना नाभिक समाज लांजाचे अध्यक्ष प्रथमेश यादव उपाध्यक्ष गणेश सावंत, अविनाश जाधव ,रविकांत चव्हाण ऋषिकेश सावंत राकेश चव्हाण व इतर समाज बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव, क्रीडा शिक्षक रवींद्र वासुरकर, प्रविण जेधे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत तालुक्यातील 14 कबड्डी संघ सहभागी झाले आहे त. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.