पंचायत समिती गुहागर समोरील मनोज जाधव यांच्या उपोषणाला यश ..! मासू गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू..!

आबलोली l वार्ताहर : गुहागर तालुक्यातील मासू गावातील जलजीवन मिशन अंतर्गत मासू खुर्द नळपाणी पुरवठा योजना करणे हे काम अद्यापही पूर्ण न केल्याबाबत मासू बौद्धवाडीतील,मासू गावातील तरुण, तडफदार व्यक्तीमत्व श्री.मनोज गौतम जाधव यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आणि आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने मासू गावातील पाण्याच्या गंभीर प्रश्नावर श्री.आनंद भोजने,श्री.विजय सिताराम भोजने,श्री.चंद्रकांत गंगाराम जाधव,श्री.चंद्रमणी राघो जाधव,श्री.राजेंद्र शंकर पवार, सुभाष काजरोळकर, विलास गुरव,गोपाळ हुमणे,अनिष तटकरे यांनी पाण्याच्या प्रश्ना संदर्भात पाठिंबा दिल्यानेच श्री. मनोज गौतम जाधव यांनी पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसले होते आमरण उपोषण छेडले होते कॉन्ट्रॅक्टरने तसेच ग्रामिण पाणीपुरवठा अधिका-यांच्या हालगर्जी पणामूळे मासू गावातील जनतेला पीण्याच्या पाण्या संदर्भात गंभीर समस्या निर्माण झाल्या होत्या यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची चौकशी करावी व अर्धवट राहिलेले काम तातडीने पूर्ण करावे अधिकारी कॉन्ट्रॅक्टरला पाठिशी घालतात त्यामुळे काम वेळेत होत नाही नळपाणी योजनेच्या कामाला दिडवर्ष उलटले तरी पाणी प्रश्न सुटत नाही जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे . जलजिवन मधुन योजना मंजूर झाली असून सहकारी मजूर संस्था खेड या संस्थेने या कामाची वर्क ऑर्डर हाती घेतली असून कामात दिरंगाई होत आहे दिडवर्ष उलटले तरी सुद्धा अद्याप काम वेळेत होत नसेल आणि शासनाचा निधी परत जाणार असेल तर त्याला जबाबदार कोण? शासनाने १५ लाख रुपये खर्च करूनहि ग्रामस्थांना पाणी मिळत नाही त्यामुळे ठेकेदारावर व दोषी अधिकाऱ्यांवर योग्यती कारवाई करावी असे अनेक गंभीर प्रश्न श्री.आनंद भोजने यांनी उपस्थित केले

मात्र ते सर्व प्रश्न बरोबर असलेतरी पाणी प्रश्न हा सुटल्याच पाहिजे यासाठी कार्यसम्राट गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांनी यामध्ये महत्वाची भूमिका घेऊन नळपाणी योजनेचे थांबलेले काम ४ दिवसात सुरु करुन देतो व पाणी प्रश्न सोडवूया असे लेखी पत्र दिले व पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिल्याने गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर या कार्यालया समोरील उपोषण गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांचेहस्ते श्री.मनोज गौतम जाधव यांनी शितपेय पिऊन आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगीत करण्यात आले होते १५ तारखेचे उपोषण व अवघ्या तीन दिवसांत कार्यसम्राट गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांनी दि.१८ रोजीच मासू गावातील नळपाणी योजनेचे काम सुरू करायला लावले प्रत्यक्ष‌ काम चालू झाल्याने व आमरण उपोषणाला यश आल्यामुळे आनंद‌ भोजने मित्र मंडळाच्या वतीने श्री.मनोज गौतम जाधव यांनी दि.१५/०१/२०२४ रोजी मासू खुर्द येथील नळपाणी योजनेच्या संदर्भात कार्यसम्राट गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांनी वैयक्तिक लक्ष घालून दि.१८/०१/२०२४ रोजी मासू गावातील प्रत्यक्षात काम सुरू केल्याने कार्यसम्राट गटविकास अधिकारी श्री.तुकाराम जाधव यांचे आनंद भोजने मित्र मंडळाच्या वतीने श्री.आनंद भोजने,विजय सिताराम भोजने, चंद्रकांत गंगाराम जाधव, चंद्रमणी राघो जाधव, राजेंद्र शंकर पवार,अमिष तटकरे, सुभाष काजरोळकर, गोपाळ हुमणे, विलास गुरव यांनी आभार मानले