रत्नागिरी Breaking : ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत अमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा छापा

३.६१ लाखांच्या मुद्देमालासह चौघे संशयीत आरोपी ताब्यात
​

रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रत्नागिरी शहरात पेट्रोलिंग करत असताना, सिव्हिल हॉस्पिटल ते निवखोल रोडवर संशयास्पदरीत्या आढळलेल्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. ताहीर रफीक कोतवडेकर (रा. थिबा पॅलेस रोड), रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा), आकीब जिक्रीया वस्ता (रा. राजीवडा) आणि रफत करीम फणसोपकर (रा. जुने मच्छीमार्केट, राजीवडा) अशी या संशयीत आरोपींची नावे आहेत.
​या संशयीत आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे ३० ग्रॅम वजनाचा ‘ब्राऊन हेरॉईन’ सदृश अमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत अमली पदार्थांसह इतर साहित्य असा एकूण ३,६१,२००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व संशयीत आरोपींना व मुद्देमालाला रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली संदीप ओगले, शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.