सुदैवाने चालकाला दोन तासांनी काढले बाहेर
दोडामार्ग | सुहास देसाई : दिवसेंदिवस तिलारी घाटअपघातास कारणीभुत ठरत असून घाट उतरत असताना एका टेम्पोला अपघात होऊन चालक गंभीर जखमी झाला आहे . या अपघातात टेम्पोचे केबिन पूर्णपणे चेपले गेल्याने चालक आतच अडकून पडला. त्यामूळे तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चालकास केबिन मधून बाहेर काढण्यात अखेर यश आले. यात स्वप्निल यादव (३२) रा. मुंबई असे जखमी चालकाचे नाव असून त्याला चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून पोलीस अधिक तपास करत आहे.
तिलारी रामाघटातून दररोज बेळगाव, कोल्हापूर, पुणे, मुंबई यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा या दक्षिण भारतातील पर्यटक गोव्याला जवळच्या मार्गामुळे या घाटातून जाण्यासाठी तिलारी घाट मार्गे जाणे पसंत करतात. कारण हा मार्ग जवळचा असल्याने तिलारी घाटातून वाहतूक मोठ्यप्रमाणावर वाढत चालली आहे. तिलारी घाट हा तीव्र उताराच्या वळणाचा असा घाट आहे. स्वप्निल यादव हा त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा टेम्पो घेऊन घाट उतरत होता. घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या तीव्र उताराच्या वळणाचा आंदाज न आल्याने परिणामी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी चालकाच्या बाजूने थेट घळणीत कलंडून अपघात झाला. सुदेवणे जीवित हानी झाली नाही.
यामध्ये अपघातात टेम्पोचे केबिनचे पूर्ण नुकसान झाले सीट व स्टेअरिंग मध्ये चालक अडकला. त्याला बाहेर पडणे मुश्किल झाले. दरम्यान रस्त्यावरून मार्गस्थ होणाऱ्या वाहन चालकांनी बचाव कार्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही स्थानिक ग्रामस्थांना बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चंदगड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले.
गाडी चालकाच्या बाजूने टेम्पो कलडल्याने व स्टेअरिंग आणि सीट मध्ये चालक अडकल्याने त्याला बाहेर काढणे मुश्किल झाले होते. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकारी दाखल होत सहायक पोलिस कसेकर अधिक तपास करीत आहेत












