राजापूर Updates: महाविकास आघाडीच्या हुस्नबानू खलिफे विजयी

Screenshot

*राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक – २०२५*

नगरसेवक पदाच्या निवडीत पारडे समसमान 
20 पैकी 10 नगरसेवक महाविकास आघाडीचे तर 10 नगरसेवक महायुतीकडे
राजापूरात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एड. हुस्नबानू खलिफे विजयी
नगरसेवक पदाच्या निवडीत पारडे समसमान
20 पैकी 10 नगरसेवक महाविकास आघाडीचे तर 10 नगरसेवक महायुतीकडे
राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूकीत लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार माजी एड. हुस्नबानू खलिफे विजयी झाल्या आहेत. त्यांनी महायुतीच्या उमेदवार श्रृती ताम्हनकर यांचा 338 मतांनी पराभव केला आहे.  तर २० नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीने दहा तर महायुतीने दहा अशा समसमान जाग जिंकल्या आहेत.
एड. खलिफे यांना या निवडणुकीत एकुण 3124 मते मिळाली तर ताम्हनकर यांना 2786 मते मिळाली. अपक्ष उमेदवार ज्योती खटावकर यांना 109 तर 52 मते नोटाला मिळाली आहेत. एड. खलिफे या पुन्हा एकदा २० वर्षांनी राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
तर 20 जागांसाठी झालेल्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीत 10 जागांवर महाविकास आघाडी तर महायुतीला 10 जागा मिळाल्या. त्यामध्ये प्रभाग 1 मधून सान्वी रावण, सौरभ खडपे, प्रभाग 2 मधून दिलीप चव्हाण व सुयोगा जठार, प्रभाग 3 मधून नेहा तानवडे, विनय गुरव विजयी झाले आहेत. प्रभाग 4 मधून उर्मीला बाकाळकर, दिलीप अमरे विजयी झाले. तर प्रभाग 5 मधून सिध्दांत जाधव, शबाना मुल्ला विजयी झाले आहेत.
 तर प्रभाग 6 मधून आफरोज झारी व जमीर खलिफे, तर प्रभाग 7 मधून अमिना गडकरी व सुलतान ठाकूर विजयी झाले आहेत. प्रभाग 8 मधून प्रेरणा नार्वेकर व राहुल तांबे विजयी झाले आहेत. प्रभाग 9 मधून जान्हवी वादक व सुबोध पवार तर प्रभाग 10 मधून सौरभ पेणकर व साजिया काझी विजयी झाले आहेत.

 

* नगराध्‍यक्ष पदासाठी उमेदवार
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१) खटावकर ज्योती सुनील -अपक्ष
२)खलिफे हुस्‍नबानू निझामुद्दीन  –
कॉंग्रेस-
३)ताम्हनकर श्रुती श्रीकांत –
शिवसेना (शिंदे)
विजयी –

नगरसेवक पदासाठी रिंगणात उमेदवार

*प्रभाग क्र. १, अ
आरक्षण – सर्वसाधारण, महिला
१)बंडबे समिक्षा सतिश  – कॉंग्रेस-
२) रावण सान्‍वी सचिन  – शिवसेना (शिंदे)-
विजयी –
*प्रभाग क्रमांक १, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) खलिफे अरबाज इब्राहीम – कॉंग्रेस-
२) खडपे सौरभ संजय – शिवसेना (शिंदे)-
विजयी –
*प्रभाग क्र.२, अ
आरक्षण -नागरिकांचा मागास प्रवर्ग
१) कुडाळी अनिल नारायण,
शिवसेना, उबाठा-
२)चव्हाण दिलीप दिवाकर – शिवसेना (शिंदे)
३) करगुटकर जितेंद्र सदानंद – अपक्ष
* विजयी –
*प्रभाग क्रमांक २, ब
आरक्षण – सर्वसाधारण, महिला
१) चव्हाण संगीता भिकाजीं
शिवसेना, उबाठा-
२) चव्हाण सुधा शांताराम  – अपक्ष
३)जठार सुयोगा सुनिल – भाजप
* विजयी –
*प्रभाग क्र.३, अp
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)तानवडे नेहा प्रमोद – शिवसेना (उबाठा)-
२) जाधव आरती गणेश  – शिवसेना (शिंदे)
३)गुरव विद्या विवेक  – अपक्ष
*विजयी –
*प्रभाग क्रमांक ३, ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) गुरव विनय सदाशिव, शिवसेना उबाठा
२)गुरव दिपक विनायक गुरव – शिवसेना (शिंदे)
३)गुरव विवेक सिताराम – अपक्ष
* विजयी –
*प्रभाग क्र.४, अ
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)चिपटे गार्गी गणेश, शिवसेना उबाठा
२) पटेल शीतल सुनील – अपक्ष
३) बाकाळकर उर्मिला अमोल – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्रमांक ४, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) खटावकर राकेश सुनिल, अपक्ष
२) बाकाळकर सुभाष शाम – कॉंग्रेस
३)अमरे दिलीप लक्ष्‍मण– शिवसेना (शिंदे)
* विजयी –

*प्रभाग क्र.५, अ
आरक्षण -अनुसूचित जाती
१)जाधव सिध्‍दांत नाना  – कॉंग्रेस
२) जाधव किशोर काशिनाथ  – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्रमांक ५, ब
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)मुल्ला शबाना निसार  – कॉंग्रेस
२)काझी सुमैय्या जिलानी  – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्र.६, अ
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
१) झारी अफरोज महंमद  – कॉंग्रेस
२) रहाटे शितल शशिकांत  – अपक्ष
३) मुकादम निलोफर मुदस्‍सर  – राष्‍ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)
विजयी –
*प्रभाग क्रमांक ६ ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) खलिफे जमिर निझाम– कॉंग्रेस
२) सय्यद खलील अहमद हसन– शिवसेना (शिंदे)
विजयी –
*प्रभाग क्र. ७, अ
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)गडकरी अमिना अशफाक  – कॉंग्रेस
२) कुशे रसिका राजेंद्र – भाजप
विजयी –
*प्रभाग क्रमांक ७, ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) ठाकूर सुलतान शरफुद्दीन  – कॉंग्रेस
२) काझी असिम साजीद  – शिवसेना (शिंदे)
*विजयी –

*प्रभाग क्र. ८, अ
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१) डंबे तनिष्‍का अजय  – अपक्ष
२) जाधव अनामिका सौरभ – शिवसेना (उबाठा)
३)नार्वेकर प्रेरणा प्रशांत – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्रमांक ८, ब
आरक्षण – सर्वसाधारण

१) दुधवडकर श्रीकांत विनायक– शिवसेना (उबाठा)
२)राहुल रमाकांत तांबे – शिवसेना (शिंदे)
३) सुशांत दिलीप मराठे – अपक्ष
विजयी –
*प्रभाग क्र.९, अ
आरक्षण- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
१) गुंडगे रेणुका राजन  – अपक्ष
२) वादक जान्‍हवी गिरीश  – कॉंग्रेस
३) सोगम नेत्रा निलेश – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्रमांक ९, ब
आरक्षण – सर्वसाधारण
४) ओगले संजय गणपत – अपक्ष
५) पवार सुबोध सुभाष  – शिवसेना (उबाठा)
६) ओगले संजय पांडुरंग – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
*प्रभाग क्र.१०, अ
आरक्षण – नागरीकांचा मागास प्रवर्ग

१) सौरभ संदीप पेणकर – शिवसेना (शिंदे)
२)मुजावर नूरमहंमद इस्‍माईल – कॉंग्रेस
* विजयी –
* प्रभाग क्रमांक १०, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) याहू नसीमा दाऊद – कॉंग्रेस
२) काझी साजिया हनिफ  – शिवसेना (शिंदे)
* विजयी –
______