मंडणगड | प्रतिनिधी : तालुक्यातील कुडूक खुर्द येथे विविध शासकीय योजनांचे लाभ थेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, आभा कार्ड नोंदणी, पी एम किसान नोंदणी, अशा शासकीय मोफत कार्ड काढण्यात आले. तसेच कामांसाठी आवश्यक विविध दाखले, सरकारी अनुदानासाठी अर्ज भरणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, अपंगांसाठीच्या योजना, वयोवृद्ध नागरिकांचे वयाचे दाखले, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, शेतकरी बांधवांसाठी विविध सरकारी योजनांचे मार्गदर्शन वसंत सुतार यांनी शिबिरांत नागरिकांना केले.
तसेच संजय गांधी, श्रावण बाळ, मातृवंदना, बालसंगोपन योजनाची माहिती देण्यात आली. या शिबिरात नागरिकांनी उस्पुर्द सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक पंढरीनाथ पवार व प्रकाश यादव यांनी केले. यावेळी नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना पोहोचण्यासाठी प्रयंत्न करणार असल्याचे व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आयोजक प्रकाश यादव यांनी सांगितले . आभार प्रदर्शन पंढरीनाथ पवार यांनी केले. कार्यक्रमास गुजरकोंड गावाचे अध्यक्ष रमेश यादव, ब्राम्हानंद यादव, संदेश पवार, लक्ष्मण कदम, मंगेश पवार, अनिल शिंदे, विशाल भालेराव, अजिंक्य जगताप, विनायक यादव यावेळी उपस्थित होते .











