वेंगुर्ले येथे उद्या भाजप तर्फे मंदिर स्वच्छता अभियान…

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची असणार उपस्थिती

वेंगुर्ले | दाजी नाईक : आपले पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले मंदिर स्वच्छता अभियान दि.१४ जानेवारी पासून संपूर्ण देशात सुरु आहे. त्याच अनुसरून वेंगुर्ले तालुक्यात “मंदिर स्वच्छता अभियान कार्यक्रम” श्री देवी सातेरी मंदिर वेंगुर्ले येथे केंद्रीय मंत्री श्री. नारायणराव राणे, भाजप जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत व सावंतवाडी विधानसभा प्रमुख मा.आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे .

तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, जिल्हा उपाध्यक्ष – भाजपा , सिंधुदुर्ग, सुहास गवंडळकर , मंडल अध्यक्ष वेंगुर्ले आणि राजन गिरप मा.नगराध्यक्ष व शहर प्रभारी यांनी केले आहे.