वेगुर्ला | प्रतिनिधी : कुडाळ येथे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची इयत्ता आठवी शिकत असलेली कु.अमृता दत्ताराम नवार हिने बाजी मारली आणि या वर्षी ची प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली कोकणासाठीच नव्हे तर अखिल भारतवर्षाला भूषणावह असणारे संसदीय नेते आदरणीय बॅ.नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेने विविध उपक्रम आयोजित करुन बॅ.नाथ पै यांच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे. त्याचा भाग म्हणून बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्या वतीने बॅ.नाथ पै यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले ची विद्यार्थिनी कु.अमृता दत्ताराम नवार हिने बॅरिस्टर नाथ पै एक थोर संसदपटू या विषयावर व्यक्त होत प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला.
तिला रोख रुपये ३००० बॅ.नाथ पै चषक आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धा समन्वयक प्रा.अरुण मर्गज यांनी यावर्षीच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी असणाऱ्यां न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले विद्यार्थ्यांनीचे विशेष कौतुक केलं.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धत जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी सहभागी होते या स्पर्धेत यश मिळवणारी अमृता नवार हिला युवा व्याख्याते सुप्रसिद्ध निवेदक, लोककला अभ्यासक म्हणून राज्य भर ओळख असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूलचे हिंदी विषय शिक्षक प्रा. वैभव खानोलकर यांनी विशेष मार्गदर्शन केलं तसेच या प्रशालेचे लिपिक अजित केरकर व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हि मार्गदर्शन व सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ले हायस्कूलचे मुख्याध्यापक
उमेश वाळवेकर,संस्था अध्यक्ष विरेंद्र आडारकर कामत, सचिव तथा जेष्ठ रांगोळीकार रमेश नरसुले, उपाध्यक्ष रमेश पिगुळकर,निलेश मांजरेकर आणि सर्व पदाधिकारी यांनी या यशस्वी विद्यार्थीनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री.खानोलकर , लिपिक श्री अजित केरकर व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व सर्व शिक्षक यांचे हि विशेष अभिनंदन केले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कु. अमृता नवार हिने जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धत केलेल्या दमदार कामगिरीचे दर्शन घडवत मिळवलेल्या प्रथम क्रमांका बद्दल तिचे तसेण तीचे पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्या वर सर्व स्तरातून कौतुक होत आहे










