बाजारपेठ मारुती मंदिर येथे व्यापारी, नागरिक, भाजप पदाधिकारी, जिल्हा बँक कर्मचारी यांचाही उत्स्फूर्त सहभाग
मालवण | प्रतिनिधी : प्रभू श्रीराम यांच्या पवित्र मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा सोमवरी 22 जानेवारी रोजी अयोध्यानगरीत संपन्न होत आहे. देशात सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून भाजपच्या वतीने मंदिर स्वच्छता सेवा अभियानही सर्वत्र राबविले जात आहे. मालवणताही भाजपा नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी मंदिर स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात आले. बाजारपेठ मारुती मंदिर येथे निलेश राणे या अभियानात सहभागी झाले.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, जेष्ठ पदाधिकारी कारसेवक हरी चव्हाण, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, संचालक आबा हडकर, परशुराम पाटकर, हर्षल बांदेकर, नारायण लुडबे, मोहन वराडकर, महिला तालुकाध्यक्ष पूजा करलकर, शहर अध्यक्षा चारुशीला आचरेकर, तारका चव्हाण,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर, उपाध्यक्ष राकेश सावंत, शहर अध्यक्ष ललित चव्हाण, आशिष हडकर, निकेत वराडकर, भाई मांजरेकर, नारायण लुडबे, महिमा मयेकर, पूजा वेरलकर, मोहन वराडकर, निशय पालेकर, अखिलेश शिंदे, राजेश पारकर, विजय चव्हाण, मयु पारकर यासह व्यापारी, भाजपा पदाधिकारी, व्यापारी संघाचे पदाधिकारी, जिल्हा बँक कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.












