0मालवण : अयोध्या नगरी येथे प्रभु श्री राम यांचा नवनिर्माण मंदिरातील प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न होत असताना घुमडे घुमडाई मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच अयोध्या नगरितील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. महाआरती ही करण्यात आली. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक दत्ता सामंत, जेष्ठ भाजप पदाधिकारी कारसेवक भाऊ सामंत यासह ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (अमित खोत, मालवण)











