खेड चौंडेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवाची २५ रोजी सांगता

 

खेड(प्रतिनिधी) शहरातील कोष्टीआळी येथील चौंडेश्वरी देवी नवरात्रोत्सवास नुकताच प्रारंभ झाला. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून २५ जानेवारी रोजी उत्सवाची सांगता होईल.

यामध्ये २० रोजी देवीची षोडषोपचारे पूजा, अभिषेक, मालाबंधन, महिलांसाठी स्पर्धा, २१ रोजी पाककला स्पर्धा, कॅरम स्पर्धा २२ रोजी भजन आदी कार्यक्रम पार पडले

२३ रोजी कुंकुमार्जन, हळदीकुंकू, लहान मुलांसाठी फनीगेम्स व बक्षीस वितरण समारंभ होईल. २४ रोजी श्री मुक्त अभिषेक, मालाबंधन, श्री चंडिकाहोम व पूर्णाहुती, संगीतखुर्ची, महिला व मुलांचे विविध कार्यक्रम व सत्यनारायणाची महापूजा होईल. २५ रोजी देवीची षोडषोपचारे पूजा, अभिषेक, मालाबंधन, घटउत्थापन, आरती व महाप्रसाद होईल. सायंकाळी ५ वाजता श्री चौंडेश्वरी देवीचा रथोत्सव निघेल. या उत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.