ढोलताशांच्या गजरात मिरवणूक; नामघोषाने शहर दुमदुमले
मंडणगड :अयोध्येतील श्रीराम मंदिरात होणाऱ्या राम मूर्ती प्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर मंडणगड शहरात ढोलताशांच्या गजरात हा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम, सीता लक्ष्मण, हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केलेल्या छोट्या रामक्तांमुळे प्रत्यक्षात आपले दैवत अवतरल्याचा भास शहर वासीयांना झाला. जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमले.
हा भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडणगड शहर वासीयांच्या वतीने गांधीचौक ते बाणकोट रोड वरील राम राम मंदिर अशी भव्य मुरवणूक काढण्यात आली. या मुरवणुकीत डीजे च्या आवाजावर थिरकणरे तरुण, खालू बाजाच्या तालावर लेझीम नृत्य करणाऱ्या महिला, गाडीवर विराजमान झालेले राम, सीता, लक्ष्मण, हनुमान सोबत राम नामाचा जयघोष यामुळे शहराला उत्सवाचे रूप प्राप्त झाले होते. शोभायात्रे दरम्यान भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच मंदिरात भजन रंगले होते. यादरम्यान पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.











