देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष व प्रशासनाचा नाकर्पतेपणा यामुळे नागरिक हैराण झाले. स्वच्छ सुंदर देवगड शहर दुर्गंधीयुक्त बनले. अखेर नागरिकांनी या दुर्गंधीला कंटाळून शहराचे नाव सेंन्टेड शहर. असे करून तसे घोषवाक्य रस्त्यावर लिहून ठेवले आहे.
देवगड शहरातील सर्वात दुर्गंधी परिसर म्हणजे कॉलेज नाका बनला आहे. कॉलेज रोडवर असलेल्या विविध कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी देवगड निपाणी रोडच्या हम रस्त्यावर वाहत आहे या गटारातून मलमूत्र असलेले पाणी जात असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या परिसरातील नागरिकांना घरात राहणे मुश्किल झालेले असताना. देवगड जामसांडे नगरपंचायत याकडे कोणतेही लक्ष देत नाही अखेर नागरिकांनी कंटाळून देवगड जामसांडे सेंन्टेड शहर असे नामकरण केले आहे तसा फलक नुकताच हमरस्त्यावर लिहिला.
देवगड चे नाव आंब्याच्या नावाने म्हणजेच आम शहर असे ठेवण्यात आले होते मात्र या मॅंगो सिटी चे नाव आता दुर्गंधीमुळे बदनाम झाले आहे विशेषता सत्ताधारी नगरसेवक यावर चुप्पी साधून आहेत
या भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो तर गटाराच्या बाजूला राहणारे एकनाथ तारकर व रवींद्र तारकर कुटुंबीय यामुळे हैराण झाले आहेत
हा रस्ता सार्वजनिक बांधकामच्या मालकीचा आहे यामुळे त्यांनी तातडीने हे गटार बंद करण्याची गरज आहे मात्र कोणतेही प्रक्रिया न करता कॉम्प्लेक्स पाणी गटारात सोडणाऱ्यांवर देवगड जामसांडे नगरपंचायतीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे मात्र प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
( छायाचित्र -: वैभव केळकर )










