ममता बॅनर्जीच्या गाडीचा अपघात, डोक्याला झाली दुखापत

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. वर्धमानहून एका कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला. अचानक गाडीला ब्रेक लागल्याने ममता यांच्या कपाळावर जखम झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका सार्वजनिक सेवा वितरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमान जिल्ह्यात गेल्या होत्या. आधी त्या येथून हेलिकॉप्टरने प्रवास करणार होत्या. मात्र खराब हवामानामुळे ते रद्द करण्यात आलं. अशातच त्यांना रस्त्याने कारने कोलकात्याला जावे लागले. मुख्यमंत्री ममता यांची गाडी भरधाव वेगाने जात होती. इतक्यात वाटेत एक उंच जागा आली. त्यामुळे चालकाने वेगाने ब्रेक लावला. अचानक ब्रेक लागल्याने कारमध्ये बसलेल्या लोकांचे संतुलन बिघडले, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली, असं सांगण्यात येत आहे.