२६ जानेवारी रोजी महाराष्ट्र संघातून ढोल वादन पथकात करणार संचलन

संतोष कोत्रे | लांजा : दिनांक २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात लांजातील शिवगंध प्रतिष्ठान या ढोल पथकातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून या दिवशी ते महाराष्ट्र संघातून ध्वज संचलन कार्यक्रमात ढोल पथकातील कौशल्य सादर करणार आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथे
प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनाच्या कार्यक्रम भारताच्या विविध भागातील शंभरहून अधिक महिलांच्या पारंपारिक वाद्यवादाने सुरू होणार आहे .
आणि यामध्ये १५०० महिला नर्तकीनचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महिला वादकांच्या टीममध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील २४ मुलांची निवड झाली असून यामध्ये शिवगंध प्रतिष्ठान लांजा या ढोल पथकातील तीन मुली आणि एक मुलगा यांची निवड झाली आहे. शिवगंध प्रतिष्ठानच्या आदित्य कांबळे तसेच अंकिता अविनाश जाधव अनुष्का अविनाश जाधव आणि पूजा कुर्ले याया तीन मुली व एक मुलगा अशा चौघांची या ढोल पथकात निवड झाली आहे.
गेले अकरा दिवस प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमासाठी लांजातील हे चार विद्यार्थी सहभागी झाले असून ते कसुन सराव करत आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात या विद्यार्थ्यांची निवड झाल्याने लांजा तालुक्यासाठी ही अभिमानास्पद बाबा असून याबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे












