सिद्धिविनायक राईवाडी कुडाळ संघाला उपविजेेपद
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित नमो चषक २०२४ अंतर्गत सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाना गावडे मित्र मंडळ तळवडे यांनी विजेतेपद पटकावले. तसेच सिद्धिविनायक राईवाडी कुडाळ संघाला उपविजेेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक सिध्देश्वर डाळकर संघ तळवडे व चतुर्थ क्रमांक सिध्देश्वर तळवडे संघ ठरला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री प्रथमेश तेली साहेब यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक आनंद नेवगी,प्रमोद गावडे,निशांत तोरसकर,दादा परब,सुशांत गावडे,विकास गावडे,किशोर सोंसुरकर आदी उपस्थित होते.











