मालवण शहरात मतदार जनजागृती मोटर सायकल रॅली

तहसीलदार कार्यालय मालवण निवडणूक विभागाच्या वतीने आयोजन

मालवण | प्रतिनिधी : राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन मालवण तहसीलदार कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीने 25 जानेवारी रोजी सकाळी मालवण देऊळवाडा सागरी महामार्ग येथून बाजारपेठ मार्गे तहसिलदार कार्यालय मालवण पर्यत मतदार जनजागृतीच्‍या दृष्‍टीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. विविध फलक हाती घेत जनजागृती करण्यात आली.

मालवण तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, निवडणूक नायब तहसीलदार नागेश शिंदे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांसह महसूल, पोलीस अधिकारी कर्मचारी, पत्रकार तसेच नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.