मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोकण प्रदेश महिला अध्यक्षा सौ. सोनाली अविनाश कदम यांची निवड

 

पनवेल ( विशेष प्रतिनिधी) मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीप मोरे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्याताई राणे यांनी निवडीची घोषणा केली.

या वेळी राज्य नेत्या सौ. वैशालीताई गलगटे यानी सांगीतले सौ. सोनालीताई एक सुविद्य, सुस्वभावी महिला नेतृत्व म्हणुन सामाजिक क्षेत्रातील परिचित आहेत. मानवता एक संकल्पना या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणुन अनेक वर्ष कार्यरत असुन पुणे कोल्हापूर चिपळूण मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील अनेक भागात त्यांनी आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात सामाजिक क्षेत्रातील सक्रीय सहभाग व योगदान कौतुकास्पद आहे. त्या बीएससी पी जी डी एम एल टी असुन जे जे हॉस्पिटल भायखळा मध्ये ब्लड बँक येथे सेवेत आहेत.

त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असुन शुभेच्छा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योजक गजाननराव साळुंखे राष्ट्रीय सल्लागार बन्सीदादा डोके राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉ. चंद्रकांत मोजाड राष्ट्रीय मीडिया अध्यक्ष दैनिक बेधडक महाराष्ट्र संपादक मुद्रक प्रकाशक मालक अभिजीत दरेकर गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे राज्य युवा अध्यक्ष प्रतापराव मोहिते महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शुभम गायकवाड यांच्या सह शेकडो समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे