वकील दाम्पत्यांच्या हत्येचा निषेध व विविध मागण्यांसाठी बार असोसिएश मंडणगडचे मुख्यमंत्र्याना निवेदन

मंडणगड l प्रतिनिधी : अँड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी अँड. मनिषा आढाव राहूरी जि. अहमदनगर यांच्या हत्येचा निषेध व हत्येचे प्रकऱण जलद न्यायालयात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा होणेबाबत याचबरोब अँडव्होकेट प्रोटेक्शन अँक्टची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याच्या मागणीकरिता 30 जानेवारी 2024 रोजी बार असोसीएशन मंडणगड या तालुक्यातील वकीलांचे संघटनेच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्र्याकरिता मंडणगड तहसिल कार्यालयाच्या माध्यमातून निवेदन सादर करण्यात आले.

संघटेनेचे अध्यक्ष अँड. मिलींद लोखंडे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तहसिलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनातील माहीतीनुसार, राहूरी येथील वकील दाम्पत्याची झालेली निर्घृण हत्या ही समाजाला काळीमा फासणारी घटना असून आरोपींचे कृत्य निंदनीय आहे, याचा आम्ही निषेध नोंदवतो. व प्रस्तृत प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपीस तात्काळ एक महिन्याच्या आता फाशी देण्यात यावी अशी विनंती शासनाला करतो. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून वकील वर्गावर असे अन्याय वेळोवेळी वाढत असल्याने अँडव्होकेट प्रोटेक्शन अँक्ट ची लवकरात लवकर अंमलबाजवणी कऱण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे. यावेळी अँड. सचिन बेर्डे, अँड. दयानंद कांबळे, अँड. धनंजय करमरकर, अँड. आदीत्य सुळे, अँड. सुमेश घागरुम, अँड. एस.बी. जाधव, अँड. राकेश साळुंखे, अँड. सोनल बेर्डे, अँड. जी.एम. ढाले उपस्थित होते.