माजगांव येथील विरजीन वेरोनिका यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव तांबळ गोठण येथील रहिवासी श्रीमती विरजीन वेरोनिका ऊर्फ निकामोंतेरो (६७) यांचे शनिवारी रात्री गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, नातवंडे, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.
गोव्यात त्यांनी शिक्षिका म्हणून सेवा केली होती. तेथेच त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे शालेय शिक्षण मालवण टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले होते. मनमिळावू व विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्या ओळखल्या जायच्या.
म्हापसा गोवा येथील समाजसेवक व समाजवादी नेते कॅजिटन परेरा, जॉनी परेरा व महाराष्ट्र बँकेचे सेवानिवृत कर्मचारी पॉली परेरा यांच्या त्या भगिनी तर मिलाग्रीस शाळेच्या शिक्षिका विल्मा क्रूज फर्नांडीस यांच्या त्या आई होत.