वीस वर्षे सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड
सिंधुनगरी | प्रतिनिधी : लैगिक अत्याचार प्रकरणी प्रमोद मधुकर परब( वय 50 )या आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास व वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा विशेष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी आज ठोठावली. सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर21 /2021( केस नंबर 25/ 2021) भा. द. वि कलम 376(1),376(2), F, J, N,376(3), POCSO act 4,6,8,12आरोपी प्रमोद मधुकर परब* वय 50 रा. पडवे तालुका कुडाळ या आरोपीने तेरा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी केलेला होता.
सदर गुन्ह्यात सरकारतर्फे कौशल्याने महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आलेले होते. सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी विशेष मेहनत घेऊन केस चालवली. सरकारतर्फे सबळ पुरावा दिल्याने आज विशेष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी आरोपीस दोषी धरले व आरोपीला वीस वर्षे सश्रम करावास व वीस हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी संपूर्ण केस चालवली व युक्तिवाद ही केला होता. सदर केसच्या सुनावणीवेळी साक्षीदारांना उपस्थित ठेवण्याकरता अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील वगैरे टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.










