राजेश गमरे 1 फेब्रुवारी 2024 रोजी बसणार पुन्हा उपोषणास

तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे उपोषणाचे निवेदन सादर करताना सामाजीक कार्यकर्ते राजेश गमरे व सहकारी.
आरोग्य विभागाने लेखी आश्वासनाची पुर्तता न केल्याने घेतला निर्णय

मंडणगड | प्रतिनिधी : प्रजासत्ताक दिनी मंडणगड येथील ग्रामिण रुग्णलायत डॉक्टरचे मागणीसाठी उपोषणास बसलले सामाजिक कार्यकर्ते राजेश गमरे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक रत्नागिरी यांनी डॉक्टर उपलब्ध करण्याबाबत दुरध्वनीवरुन दिलेला संदेश व वैद्यकीय अधीक्षक ग्रामिण रुग्णालय मंडणगड यांनी लेखी पत्र देवून दिलेल्या आश्वासनांची पुर्तता संबंधीत खात्याने न केल्याने राजेश गमरे 1 फेब्रुवारी 2024 रोजी मंडणगड तहसिल कार्यालयासमोर पुन्हा एकदा उपोषणास बसणार आहेत.

राजेश गमरे यांनी या विषया संदर्भात संदर्भात 31 जानेवारी 2024 रोजी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तहसिलदार तानाजी शेजाळ यांची भेट घेऊन त्यांच्याकडे फेर उपोषणाचे निवेदन सादर केले आहे. या निवेदनातील माहीतीनुसार तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने व संबंधित खाते जाणीवपूर्वक दुर्लक्ष व थट्टा करीत करत असल्याने अनेक नागरिकांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. सुसज्ज रुग्णालय आहे परंतु आवश्यक डॉक्टर नाहीत ते उपलब्ध व्हावेत याकरिता आम्ही दिनांक 26 ते 29 जानेवारी 2024 या चार दिवसांचे कालावधीत तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसलो होतो. 29 जानेवारी 2024 उपोषण मागे घेण्याकरिता तातडीने म्हणजे 30 जानेवारी 2024 रोजी रुग्णलयासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टर उपलब्ध करुन देण्याचे लेखी आश्वासन आरोग्य विभागाकडून देण्यात आले होते. पंरतु आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पुर्तता अद्याप करण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी मंडणगड तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. उपोषणाचे दरम्यान उपोषणकर्त्यांचे जिवीतास धोका निर्माण झाल्यास त्यांची संपुर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची व शासनाची असेल यांची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय रत्नागिरी यांच्यासह सर्व संबंधीत यंत्रणांना पोहच करण्यात आली आहे.