दि.३१जानेवारी 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेर्डी (सती)चिंचघरी विद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय युवा नेते कुु.अनिरुद्ध निकम सर उपस्थित होते तसेच संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक सर उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल व बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्याना संघर्ष करून यश संपादन करण्यास सांगितले विद्यार्थांना शिक्षणाचे महत्त्व सांगतांना पुढे जाण्यासाठी ज्या क्षेत्राची आवड आहे त्या तसेच परीक्षेसाठी व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच युवा नेते कु.अनिरुद्ध निकम यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत इ.12 वी नंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करण्याच्या संदर्भात तसेच स्पर्धा परीक्षा संदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.शिक्षक मनोगतात श्री.जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना या स्पर्धेच्या युगात चांगली प्रगती करण्यासाठी आपल्या जिवनाचे ध्येय ठरवायचे असते.त्यासाठी जिद ,चिकाटी,मेहनत या तिन गोष्टींचा अवलंब केला पाहिजे.तेव्हाच जिवनामध्ये आपण आपली प्रगती करू शकतो.यानंतर सौ.राजेमहाडिक मॅडम यांनी विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्यासाठी एक निश्चित ध्येय बाळगणे त्यानंतर त्या दिशेने वाटचाल करण्यास योग्य परिश्रम घ्यावे.जीवनात ध्येय नसेल तर कुठेही पोहचता येत नाही.त्यामुळे आपले ध्येय निश्चित करा असे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थी मनोगतामध्ये अनुष्का सकपाळ,तन्वी पेडणेकर व स्नेहा शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शाळा,कॉलेज,व शिक्षक यांनी आपल्या शालेय जीवनात शिस्त,संस्कार व गुणवत्ता वाढीसाठी घेतलेल्या कठोर मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक,युवा नेते कु.अनिरुद्ध निकम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर सर, उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर,पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील,व पर्यवेक्षिका सौ.आसावरी राजेशिर्के मॅडम तसेच सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.राजेंद्र पवार यांनी केले.तर आभार श्री.शैलेश कुळे यांनी मानले.












