कणकवली : मराठी राजभाषा गौरव दिन व कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त कणकवली नगरवाचनलायाच्या आप्पासाहेब पटवर्धन सभागृहात ग्रंथ व पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी वाचकांनी गर्दी केली होती.
या प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी वाचनालयाचे हनीफ पिरखान, माजी नगरसेवक गौतम खुडकर, वैजयंती करंदीकर, अच्युत देसाई, शिल्पा पिंडकुरवार, यश बाणे, जय वळंजू, ग्रंथपाल राजन ठाकूर, लिपीक स्नेहा चव्हाण, कर्मचारी अनिल मुसळे यांच्यासह
विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी भाषेच्या उद्धारासाठी प्रत्येकाने मराठी भाषा वापर आपल्या दैनंदिन कामकाजात केल्यास मराठी भाषेचे महत्व वाढेल.
आपल्या संस्कारांची भाषा ही मराठी आहे. त्यामुळे मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील विविध लेखकांची पुस्तके वाचावीत, असे आवाहन हनीफ पीरखान यांनी यावेळी बोलताना केले. साहित्यिक व कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस शासनाने मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने सोमवारी कणकवली नगरवाचनालयात कथा, कादंबरी, विविध मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.