देवगड (प्रतिनिधी)दि
महाळुंगे शाळा नंबर १ वर मागील तीन महिन्यापासून फक्त एक शिक्षक आहेत शाळा सातवी पर्यंत असून पट ३२ आहे,एक शिक्षक यांना शिकविणे, मुख्याध्यापक काम, ऑनलाईन माहिती भरणे ही कामे असतात त्यामुळे त्यांना अवघड होते शाळेला चार शिक्षक मंजूर आहेत पैकी दोन बदली होऊन गेले,एकांचा अपघात झाल्याने येत नाहीत याकरिता अनेक वेळा संबधित अधिकाऱ्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली परंतु उपयोग झाला नाही,मागील तीन महिने अभ्यास नाही त्यापेक्षा मुलांना घरीच ठेवू या निर्णयावर पालक आलेत याला वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे त्यानुसार सोमवार ५ फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती देवगड या ठिकाणी शाळेतील सर्व मुले देवगड पंचायत समिती समोर आंदोलनास बसली होती.
मात्र देवगड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (उच्चतर वर्ग १) वृक्षाली यादव यांनी यावर सामोपचाराने तोडगा काढत तात्पुरत्या शिक्षकाच्या नियुक्तीचे लेखी पत्र महाळुंगे यांच्याकडे सुपूर्द केले.त्यामुळे हे आंदोलन ग्रामस्थांनी स्थगित केले आहे.
त्यांना दिलेल्या पत्रात, देवगड तालुक्यामध्ये शिक्षकांची रिक्त पदाची संख्या जास्त आसल्याने कमी पंट सख्येकडून जास्त पट संख्येकडे आपणास जि. प. शाळा महाळुंगे नं. 1 येथे तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी व्यवस्था म्हणुन कामकाज करावयाचे आहे. तरी आपणास जि.प.शाळा महाळुंगे नं.1 येथे तात्पुरत्या पर्यायी व्यवस्थेने हजर होण्यासाठी जि.प.शाळा कुवळे नं. 1 या शाळेतुन या कार्यालयाकडून दिनांक 05/02/2024 रोजी कार्यालयीन वेळेनंतर कार्यमुक्त करण्यात येत आहे. तरी आपण दिनांक 06/02/2024 पासून पुढील आदेश होईपर्यत तात्पुरत्या पर्यायी व्यवस्थेने दिलेल्या शाळेवर हजर राहावे. असे या पत्रात नमूद केले आहे.यावेळी महाळुंगे सरपंच संदीप देवळेकर, ग्रामस्थ रामकृष्ण राणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा नवले, साक्षी देवळेकर,श्रावणी देवळेकर आदीसह विद्यार्थी , ग्रामस्थ , पालक उपस्थित होते.












