वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे विविध पुरस्कार जाहीर

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या श्रीराम विद्यालय ,तु.पु.शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय व का.रा.कोळवणकर यामाहा ट्रेनिंग सेंटर मार्फत कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सदर पुरस्कारांचे वितरण १० फेब्रुवारी रोजी केले जाणार आहेत. सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे-
स्व. रमेश धोंडू डोळस आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार जिल्हास्तरीय—-१) उमेश केशव केसरकर, पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ,शिरवली. राजेश जगन्नाथ गोसावी, पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद, पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा ,झरेवाडी .तालुका रत्नागिरी. स्व. रमेश धोंडू डोळस आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पुरस्कार, जिल्हास्तरीय.– रविंद्र चंद्रकांत वासुरकर.

न्यू इंग्लिश स्कूल ,लांजा. स्व. श्री. रमेश धोंडू डोळस आदर्श समाजसेवक पुरस्कार, जिल्हास्तरीय. —
अविनाश उर्फ राजू जाधव, लांजा. स्व. श्री रमेश धोंडू डोळस कला गौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय. —.सुनील बलवंत बेंडखळे, रत्नागिरी. स्व. रमेश धोंडू डोळस आदर्श सरपंच पुरस्कार, तालुकास्तरीय- गणेश साळुंके. कोर्ले. कै. गंगाधर धोंडू उर्फ भाईसाहेब लाड ,जिवन गौरव पुरस्कार, जिल्हास्तरीय. —डॉ अनिल त्र्यंबक पत्की. लांजा. कै. मनोहर विठोबा उर्फ डॅडी कोकाटे. उत्कृष्ट क्रिडापटू पुरस्कार, जिल्हास्तरीयनिलेश नंदकिशोर कुळये. वेरवली बुद्रुक ,तालुका -लांजा. कै. का. रा. उर्फ भाईसाहेब कोळवणकर .उत्कृष्ट संस्था पुरस्कार ,जिल्हास्तरीय- राजू काकडे हेल्प अकॅडमी, देवरुख. स्व.रमेश धोंडू डोळस .आदर्श कर्मचारी पुरस्कार, तालुकास्तरीय- राजेंद्र भीमराव शेळके-क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी. ग्रामीण रुग्णालय, लांजा. कै. बाळशेठ कोळवणकर वेरवली पंचक्रोशीस्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार- जीवन दिनकर माळी- केळंबेसदर पुरस्कारांचे वितरण खासदार विनायक राऊत तसेच आमदार राजन साळवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश कोळवणकर, संस्था अध्यक्ष मारुती डोळस यांच्या हस्ते होणार आहे या सर्व सत्कारमूर्तींचे कौतुक करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहा असे आवाहन वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत आहे,