कुडाळ कविलकाटे येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रम

स्वप्नील कदम l कुडाळ    :       तालुक्यातील कविलकाटे येथील श्री सिद्धिगणपती मंदिर येथे माघी गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक व सांस्कतिक कार्यक्रमांचे आयोजन दि.10ते 13 फेब्रुवारी दरम्यान कऱण्यात आले आहे. शनिवार दि.10फेब्रु रोजी सायं.7 वा श्रींची आरती, रा 9.30 वा श्री देव सिद्धेश्र्वर दशावतार नाट्यमंडळ, बाव यांचा नाट्यप्रयोग. रविवार दि.11 फेब्रु रोजी सायं.7 वा श्रींची आरती व रात्री 8 वा स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम..

सोमवार दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजता सद्गुरु श्री वामनराव पै जीवनविद्या मिशन यांच्या वतीने हरिपाठ, सायं 7 वा श्रींची आरती रात्री 9.30वाज. दशावतार नाट्य मंडळ म्हापन यांचे ‘ट्रीक्सयुक्त लक्ष्मी उदरी आदिषेश’नाट्य प्रयोग सौजन्य सौ.ज्योती जळवी नगरसेविका.. मंगळवार 13 रोजी पहाटे 5 वा. अरुण पेडणेकर यांच्याकडून श्रींची पाद्यपूजा. सकाळी 10.30 वा ह. भ प श्री राजू मुंडे यांचे गणेश जन्मावर शुश्राव्य कीर्तन दु.12 वा श्री गणेश जन्म सोहळा महाआरती दु.1 वा महाप्रसाद, दु.2वा श्रूशाव्य भजने, दु.3 वा. हळदी कुंकू,सायं.4 वा चामुंडेश्वरी फुगडी मंडळ यांची फुगडी व 5वा.श्री सिद्धि गणपती फुगडी मंडळ यांची फुगडी. सायं.6वा. श्रींची महाआरती. सायं 6.30 वाजता खानोलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा रज्ययक्षमा नाट्यप्रयोग.रात्री 10.30 वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम यावेळी निवेदक म्हणून समीर चराटकर निवेदन करणार आहेत.तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.