विज्ञान दिनानिमित्त मालवण भंडारी हायस्कुल येथे विज्ञान प्रदर्शन

Google search engine
Google search engine

 

मालवण | प्रतिनिधी
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मालवण भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर विज्ञान प्रयोग व प्रतिकृती सादर केल्या.

प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक वामन खोत, माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम, विज्ञान शिक्षक संदीप अवसरे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनासं मान्यवरांसह इतर विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रयोग व प्रतिकृतीची वैज्ञानिक माहिती दिली. या प्रतिकृतींचे सर्वांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक संदीप अवसरे यांचे मार्गदर्शन लाभले.