आरोंदा येथून घेतले ताब्यात : १०९ अंतर्गत कारवाई
तहसिलदार श्रीधर पाटील यांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : आरोंदा येथे तेरेखोल खाडीपात्रात अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या १५ जणांविरोधात महसूल विभागाने कारवाई करीत त्यांना सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर १०९ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी दिली. दरम्यान, वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोवा राज्यातील होड्या मात्र पळून गेल्याने त्यांच्यावर कारवाई करता आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.











