स्वप्निल | कदम कुडाळ
खादी ग्रामोद्योग योजनेच्या वतीने ग्रामोद्योग विकास योजना अंतर्गत कोकणातील पहिलेच नवनिर्मित खादी ग्रामोद्योग भावनाचे कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, डॉ.मिलींद कुलकर्णी, दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर, पप्प्या तवटे, दीपलक्ष्मी पडते, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यनारायण शुक्ला व राज्य निदेशक महाराष्ट्र योगेश भामरे, राज्य कार्यालयातील टीम, ग्रामोद्योग योजनेचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंत्री नारायण राणे यांनी खादी ग्रामोद्योग भवन उद्घाटन करून शोरूमचे पाहणी केली.
कोकणातील पहिलेच खादी ग्रामोद्योग भवन कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी उपस्थित खादी ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले.












