पाली | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील चोरवणे-ब्राम्हणवाडी येथे ॐ साई जुगाई मित्रमंडळ, व महिला मंडळ ब्राम्हणवाडी व साईधाम मित्र मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे मंगळवार दि.१३ ते शनिवार दि.१७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत श्री माघी गणेशोत्सव संपन्न होत आहे.
या पाच दिवसांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधे मंगळवार दि. १३ रोजी सकाळी ९. वा. श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, दुपारी १२ वा. आरती, सायं. ७वा. महाआरती. रात्रौ ९.०० वा. सांस्कृतीक कार्यक्रम ब्राम्हणवाडी,बुधवार दि. १४ रोजी दुपारी १२ वा-आरती, दुपारी ०२ वा. महिलांचे हळदीकुंकू ब्राम्हणवाडी, चोरवणे रात्रौ ९ वा. भजन – वारकरी भजन मंडळ कोंढरण यांचे सुश्राव्य भजन,गुरूवार दि. १५ रोजी सकाळी ९ वा. पासून क्रिकेट स्पर्धा ब्राम्हणवाडी मर्या. रात्रौ ९ वा. साईधाम मुंबई व ओमसाई यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम,शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ ते ४ महाप्रसाद सायं. ७ वा. आरती, रात्रौ १० वा. नमन रवळनाथ रिमिक्स लय भारी रत्नागिरी यांचे नमन,शनिवार दि. १७ रोजी सकाळी ११ वा. आरती, सायं. ३वा विसर्जन असे कार्यक्रम होणार आहेत. तरी गणेश भक्तानी उत्सव कालावधीमध्ये संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ॐ साई जुगाई मित्रमंडळ, चोरवणे-ब्राम्हणवाडी यांनी केले आहे.












