मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात पीएचडी पदवी प्रदान
संतोष कुळे l चिपळूण : गुहागर तालुक्यातील दोडवली गावचे सुपुत्र डॉ. संतोष नारायण निकम यांना ७ फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात पार पडलेल्या दिक्षांत समारंभामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास या विषयामध्ये Ph.D पदवी प्रदान करण्यात आली. संतोष निकम यांच्या यशाबद्दल सर्वांनीच त्यांचे कौतुक केले आहे.
गुहागर मधील दोडवली गावातून मुंबई शहरात आल्यावर श्री. निकम यांनी नोकरी करत असताना मनात PHD करण्याचा निर्धार केला. यासाठी त्यांनी ग्रामीण विकास हा विषय निवडा आणि त्या दृष्टीने परिश्रम करून हे यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनातून ग्रामीण भागतील जीवन कसे असते. तिथल्या लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावे लागते याबाबत अतिशय मार्मिक संशोधन त्यांनी केले आहे. हा शोध प्रबंध कोकणातील अठरापगड जातींचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यांना अनेक अभ्यासू व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे. यामध्ये प्राचार्य डॉ. सुभाष अमर सावंत, चंद्रकांत बावकर, पी. डी. ठोंबरे आणि समाजातील इतर व्यक्ती यांच्याही समावेश होतो.
डॉ. संतोष निकम हे कुणबी युवा शिक्षण विभागाचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी घेतलेली यशाची गरुडझेप निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरेल.
अपार मेहनत घेत श्री. निकम यांनी PHD प्राप्त केली आहे. त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.











