मंडणगड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी व कुटुंबियांची आरोग्य तपासणी

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड पोलीस ठाणे यांच्यावतीने 1 मार्च 2023 रोजी पोलीस ठाणे मंडणगड येथे पंदेरी आरोग्य केंद्र व आय केयर खेड यांच्यावातीने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी किडीनी, शुगर, रक्त, लिव्हर व डोळ्यासंबंधीचे सर्व आजाराची तपासणी करण्यात आली.तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमिष आटपाडकर, सी.ई.वो. डॉ. गीता बोलकर, श्री.शेख, श्री. खुळे, लँब टेक्नीशीय श्री. आशिष किर यांनी पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली. पोलीस निरिक्षक सौ. शैलजा सावंत यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियाकरिता राबवण्यात आलेल्या या उपक्रमांबद्दल सर्व आयोजकांचे आभार मानले आहेत.