मोडकाआगर l वार्ताहर :गुहागर तालुक्यातील मढाळ (कारकरवाडी) येथील ॐकार सेवा मंडळाच्या वतीने ॐकारेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळा सोमवार दि. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे याहीवर्षी माघी गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते २ वा.ॐकारेश्वर मंदिराचा जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळा
दुपारी २.३० वा.महाप्रसाद,
सायं. ६ ते ७.३० वाजता हरिपाठ (गुहागर तालुका वारकरी सांप्रदाय) रात्रौ ठीक ९.३० वा.
हरि किर्तन (ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर)
मंगळवार दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ वा.श्री ॐकारेश्वर पालखी मिरवणूक सोहळा
सकाळी ११ वा.श्री ॐकारेश्वर अभिषेक,दुपारी २ वा.श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी ३ वा. महिलांचे हळदी कुंकू समारंभ,सायं. ६ वा.महाप्रसाद
रात्रौ ८ वा.ॐकार सेवा मंडळ यांचे भजन,रात्रौ. ९.३० ते १०.३० वा. सत्कार समारंभ,रात्रौ. १०.३० वा.आई जिवदानी कला फांउडेशन मुंबई, महाराष्ट्र रजि. प्रस्तुत हौशी कलावंत स्त्री पात्राने नटलेले
कोकणचे बहुरंगी नमन
शाहिर भिकाजी भुवड निर्मित
लोकनाट्य नमन गौळणीचा थाट सोबत वगनाट्य – वासनासंगीत/लेखक भिकाजी भुवड तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई कार्यकारणी अध्यक्ष – दिनेश कारकर,सचिव राकेश पागडे
खजिनदार विलास पागडे
स्थानिक कार्यकारणी अध्यक्ष रविंद्र कारकर,सचिव संजय पागडे
खजिनदार शांताराम कारकर तसेच
ॐकार सेवा महिला मंडळ यांनी केले आहे.











