शहरातील टेकडी गणेश मंदिर येथे मंगळवारी १३ फेब्रुवारी होणार माघी गणेशोत्सव

लांजा (प्रतिनिधी) शहरातील वैभव वसाहत येथील टेकडी गणेश मंदिरामध्ये मंगळवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री माघी गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत सकाळी ७.०० वाजता श्रींची पंचामृती पूजा त्यानंतर ९ ते ११ सहस्त्रावर्तन, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत श्री गणेश जन्मोत्सव कीर्तन ह भ प कुमारी अमृता नवाथे( जावडे). दुपारी एक ते तीन या वेळेत श्रींचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असून रात्री ८ ते ९ या वेळेत संत गोरोबाकाका वारकरी मंडळ कुंभारवाडी यांचे भजन कार्यक्रमावर आहे.