रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव २०२४

रत्नकांत जगताप यांचा ‘महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी’ बुधवारी

  रत्नागिरी:  ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ अंतर्गत उद्या बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजता रत्नकांत जगताप यांचा शिवराज्याभिषेक आणि सांस्कृतिक परंपरा दर्शन घडविणारा ‘महाराष्ट्राची लोकधारा संगीत रजनी’ हा कार्यक्रम होणार आहे.*

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय व रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्यावतीने येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात रविवार दि. ११ फेब्रुवारीपासून ‘रत्नागिरी महासंस्कृती महोत्सव-२०२४’ ला सुरुवात झाली आहे. याला रत्नागिरीकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवात पारंपरिक कलाप्रकारही स्थानिक कलाकारांकडून सुरुवातीलाच सादर करण्यात येत आहे.

या महोत्सवाला प्रवेश विनामुल्य असून, १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आस्वाद रसिक प्रेक्षकांनी घ्यावा.