मुंबई : काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई शहर अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
भविष्यात राज्याच्या विकासासाठी सोबत येऊन आम्ही एकत्र काम करणार आहोत. देवेंद्र फडणवीस हे नेहमीच सकारात्मक राहिले, आम्हाला साथ दिली. मी प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करेन. राज्यात भाजपला कशा अधिक जागा मिळतील यासाठी काम करू, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.












