शिरगाव येथे कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूणची सभा उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील शिरगाव येथील कुणबी सेवा संघ समाज मंदिरात कुणबी समाजोन्नती मुंबई शाखा ग्रामीण चिपळूण यांची जनजागृतीपर सभा पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष कुळे होते.

 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या संघाची तळागाळातील समाज बांधवांना माहिती व्हावी आणि समाजात जागृती करण्यासाठी अशा सभांचे आयोजन केले जात आहे. संघाची कार्यप्रणाली आणि प्रचार व प्रसार करण्यासाठी सध्या कुणबी शाखा ग्रामीण चिपळूण तालुक्यात सभा घेत आहेत. या कार्यक्रमाला उपाध्यक्ष महेश कातकर, सुरेश गोलमडे, हरिश्चंद्र फुटक, सल्लागार शरद शिगवन, संजय जाबरे, निलेश कदम, श्रीराम डिके, सहसचिव कल्पेश बाईत, नितेश खाडे, महिला संघटक लिना फुटक आणि जेष्ठ समाज बांधव उपस्थित होते. या सभेत संघ वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन रविंद्र भाताडे यांनी केले.