रेखाकला परीक्षेत एस. एम. प्रशालेची उत्कृष्ट कामगिरी

कणकवली : एस. एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये रेखाकला अंतर्गत घेण्यात आलेल्या एलिमेंटरी ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा यामध्ये एस. एम. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

 

या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये कु. पूर्वा संतोष सावंत ( प्रथम ), कु. अनुष्का अमोल केतकर ( द्वितीय ), कु. किमया सतीश हिंदळेकर ( तृतीय ) तर द्वितीय श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी व तृतीय श्रेणी मध्ये ३४ विद्यार्थीनींनी यश संपादन केले आहे.

 

एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये कु.मयूर संतोष मिस्त्री, कु. अनुश्री अभिजीत राणे, कु. परीणी किरण तळेकर, कु. चैताली नागेश राणे, कु‌. तनिष्का समीर गुरव कु. पियुष मकरंद वायकर, कु. आदिती दयानंद चिंदरकर, कु. रत्नाली शैलेंद्र डिचोलकर, द्वितीय श्रेणी मध्ये १७ विद्यार्थी तर तृतीय श्रेणी मध्ये ५२ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली चे कार्याध्यक्ष एस. एन. तायशेटे, सचिव डी. एम. नलावडे, उपकार्याध्यक्ष एम. ए. काणेकर, त्याचप्रमाणे प्रशालेचे मुख्याध्यापक जी. एन. बोडके, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.