नवरीला हार घालून नवरदेव कोसळला, मृत्यूच धक्कादायक कारण उघड

Google search engine
Google search engine

सीतामढी : बिहारच्या सीतामढी इथे एका गावात एका लग्न समारंभात वधू-वराने एकमेकांना वरमाला घातल्यानंतरच नवरदेवाचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. नवरदेवाला स्टेजवरच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, या मृत्यूचं कारण डीजे असल्याचं मानलं जात आहे. डीजेच्या खूप मोठ्या आवाजामुळे वराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. लग्नात सगळी मजेदार गाणी वाजत होती. स्टेजवर वरमाला घालण्याचा कार्यक्रम चालू होता. यानंतर वर अचानक बेशुद्ध होऊन स्टेजवरच पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी वराला तातडीने स्थानिक खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आलं, तिथे तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं. ही घटना बुधवारी रात्रीची आहे. सुरेंद्र कुमार असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. तो रेल्वेमध्ये ग्रुप-डी म्हणजेच ट्रेन ड्रायव्हरची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.